गणेशोत्सव २०१९

 

लालबागचा राजा उदघाटन सोहळा २०१९

       सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ४.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागच्या राजा गणेशोत्सव २०१९ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागचा राजा चा वार्षिक अहवाल २०१९ चे प्रकाशन करण्यात येईल.

        ‘श्रीं’ची आरती दुपारी १२.३० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते होईल. तसेच रात्रौ ८.३० वाजता आरती होईल.

        लालबागचा राजा चे दर्शन भाविकासाठी सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजेपर्यंत चालु राहिल.

 

लालबागचा राजा चरणस्पर्श

     लालबागचा राजा चे चरणस्पर्श सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ सकाळी ६.०० वाजल्यापासून बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत  चालू राहील.

        लालबागचा राजा चे चरण स्पर्शा साठी आलेल्या भाविकांची रांग ग. द. आंबेकर मार्गावरील ओमशांती डेव्हलपर्सच्या आवारातून लागेल. या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांनी करीरोड – भारतमाता सिनेमा – साईबाबा पथ – ग. द. आंबेकर मार्ग या मार्गाचा वापर करावा. रेल्वे मार्गाने येणा-यांनी मध्य रेल्वेचे करीरोड स्थानक वा पश्चिम रेल्वेचे लोअर परेल स्थानक अथवा हार्बर मार्गाचे कॉटनग्रीन रेल्वे स्थानक येथे उतरावे.

 

लालबागचा राजा मुखदर्शन

     लालबागचा राजा चे मुखदर्शन भाविकांसाठी सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजेपर्यंत चालु राहिल.

    लालबागचा राजा चे मुख दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांची मुख दर्शन रांग ही रांग दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथून चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण (गरमखाडा मैदान) मार्गे ‘श्रीं’ च्या आवारात येईल. मुख दर्शन घेऊन इच्छिणा-या भाविकांनी मध्य रेल्वे मार्गाचे भायखळा स्थानक अथवा हार्बर रेल्वे मार्गाचे कॉटनग्रीन रेल्वे स्थानक येथे उतरावे.

भाविकांसाठी महत्वाची सुचना :

लालबागचा राजा ची चरणस्पर्शाची रांग ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०६.०० वाजता बंद करण्यात येईल.


लालबागचा राजा ची मुखदर्शनाची रांग बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजता बंद करण्यात येईल.